अश्रुचे पाणी.....

गगन भरारी इमारती
पावसाखाली न्‍हात होत्‍या
इमारतीच्‍या उग्र घाणीत
पायथ्‍याच्‍या झोपडया वाहत होत्‍या
पाहता नजर माझी गेली
झोपडीतील त्‍या बालकावर
नव्‍हते ज्‍याचे वस्‍त्र
एक सुध्‍दा शरीरावरते
बालक अस्‍वच्‍छ पाण्‍यात
कपडे करत होता स्‍वच्‍छ
त्‍याला वाटत तरी नसाव
आता होणार हे पुच्‍छगुच्‍छ
बालकाला विचारण्‍यास
वाहुन आले माझे स्‍पंदन
प्रश्‍नाअंती उलट आले
उदया आहे झंडावंदन
वाटलं मला मित्र हो
त्‍याला  नाही गणवेश
हाच का हो माझा तो
सोन्‍याचा हा भारत देश
अंतःकरणात बालकाच्‍या
दुःख किती ये पिचलेलं
डोळ्यात ही अश्रू तुडुंब होते साचलेले
अश्रु होते न दिसणारे
माथ्‍यावरील पाण्‍यासमवेत
वाहुन जात होते सारे.
* पत्रकार भैरवनाथ कानडे, चिकुंद्रा

 
Top