बंगळूर :- सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील दिग्गज कंपनी असणा-या मायक्रासॉफ्टने आयोजित केलेल्‍या विंडोज-८ या अॅप्लिकेशन फेस्टिव्‍हलची नोंद चक्‍क गिनिज बुकात झाली आहे. सॉफ्टवेअर निर्मितीसाठी या अनोख्‍या महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले होते. त्‍यात २,५६७ सॉफ्टवेअर डेव्‍हलपर्स सहभागी झाले होत. या सर्व संशोधक मंडळींनी अठरा तासात क्षणभर देखील न थांबता कोडिंग मॅरेथॉना अनोखा थरार अनुभवला. नव्‍या कॉम्‍प्‍युटर अॅप्लिकेशनची निर्मिती, त्‍याचे डिझायनिंग आणि चाचणीला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी या महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले होते. या सॉफ्टवेअर निर्मितीच्‍या मॅरेथॉनमध्‍ये एवढया मोठया संख्‍येने डेव्‍हलपर्स सहभागी होण्‍याची ही पहिलीच वेळ असल्‍याचे गिनीज वर्ल्‍ड रेकॉर्डचे उपाध्‍यक्ष पॉल ओ नील यांनी सांगितले. या अनोख्‍या विश्‍वविक्रमामुळे मायक्रोसॉफ्टच्‍या नावाला संगणकीय विश्वामध्‍ये एक वेगळेच वलय प्राप्‍त झाले आहे. यापूर्वी कोणत्‍याही कंपनीने अशाप्रकारच्‍या महोत्‍सवाचे आयोजन केले नव्‍हते. या महोत्‍सवाचे आणखी एक वैशिष्‍ट्य म्‍हणजे त्‍यात देशभरातील असंख्‍य होतकरू आणि मेहनती विद्यार्थ्‍यांना त्‍यांचे कौशल्‍य दाखविण्‍याची संधी मिळाली. तसेच उदयोन्‍मुख सॉफ्टवेअर अभियंत्‍यांना आंतरराष्‍ट्रीय व्‍यासपीठ उपलब्‍ध होऊ शकले. * सौजन्‍य - पुढारी
 
Top