लोहारा -: लोहारा ते माकणी जाणा-या रोडवर, लोकमंगल साखर कारखान्याजवळील रोडवर ट्रक (एमएच 25 यू 554) चा चालक लक्ष्म्ण तात्याराव बिराजदार (वय 21 वर्षे, रा. मुळज, ता. उमरगा) याने त्याचे ताब्यातील मालट्रक ही भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून दारूचे सेवन करून नशेत ट्रक वेडीवाकडी वळणे घेवून धोकादायकरित्या चालवित असताना पोलीसानी त्यास अटक केली आहे. याप्रकरणी पोना पांडुरंग आलुरे यांनी लोहारा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून ट्रकचालकाविरूद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोना आलुरे हे पुढील तपास करीत आहेत.