उस्‍मानाबाद -: शेतातील सोयाबीनचे पीक काढण्‍याच्‍या कारणावरून दोन गटात काठी, दगडाने, लोखंडी खिळ्याने झालेल्‍या मारहाणीत तिघे गंभीर जखमी झाले असून परस्‍परविरोधी तक्रारीवरून दोन्‍ही गटाचे मिळून सातजणांविरूद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. ही घटना गावसुद (ता. उस्‍मानाबाद) येथे शनिवार रोजी सकाळी अकरा वाजण्‍याच्‍या दरम्‍यास घडली.
                अरूण मारूती गाडेकर, मारूती अंबादास गाडेकर, साहेबराव अनुचंद येडके, बिभीषण येडके, गोवर्धन येडके, दाजी येडके, महादेव येडके (सर्व रा. गावसुद, ता. उस्‍मानाबाद) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींचे नावे आहेत. तर गोवर्धन येडके, दाजी येडके, मारूती गाडेकर असे गंभीर जखमीं झालेल्‍यांचे नावे आहेत. आमच्‍या शेतातील सोयाबीनचे पीक का काढतो, असे सांगून या कारणावरून काठी, दगडाने केलेल्‍या मारहाणीत वरील तिघेजण जखमी झाले असून दोन्‍ही गटाने परस्‍पर विरोधी तक्रार दिल्‍यावरून सात जणांविरूद्ध गुन्‍हा दाखल झाला आहे. हवालदार टकले पुढील तपास करीत आहेत.
 
Top