उस्मानाबाद :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम हे मंगळवार,दि.23 रोजी तुळजापूर येथे येत आहेत. त्यांच्या दौ-याचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
सकाळी 6-15 वाजता तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन. 7-10 वाजता तुळजापूर देवस्थानास भेट व दर्शन. 9 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन. 10-15 वाजता उस्मानाबाद जिल्हा कार्यालयांच्या कामकाजासंदर्भात जिल्हा व्यवस्थापकाची आढावा बैठक, स्थळ- शासकीय विश्रामगृह, तुळजापूर, 11-30 वा. उपस्थित लाभार्थी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या भेटी व चर्चा. स्थळ- शासकीय विश्रामगृह,तुळजापूर. दुपारी 12-30 वा. तेथून पुणे मार्गे मुंबईकडे प्रयाण.