सोलापूर -:  वने, पुनर्वसन व मदतकार्य आणि भूकंप पुनर्वसन मंत्री ना. डॉ. पतंगराव कदम हे सोलापूर जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-यातील कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे -
          रविवार दि. 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 12.05 वाजता आर्की हेलिपॅड बाणेर येथून खाजगी हेलिकॉप्टरने ति-हे ता. उ.सोलापूर येथील हेलिपॅड येथे आगमन व शासकीय मोटारिने सिध्दनाथ शुगर मिल ति-हे ता. उत्तर सोलापूरकडे प्रयाण. दुपारी 12.15 वाजता सिध्दनाथ शुगर मिल, ति-हे येथे आगमन, दुपारी 1 वाजता मा. मुख्यमंत्री महोदयांसमवेत आ. दिलीप माने यांनी आयोजित केलेल्या सिध्दनाथ शुगर मिलच्या सन 2012-13 च्या गळीत हंगाम शुभारंभ उपस्थिती. दुपारी 2.15 वाजता सिध्दनाथ साखर कारखाना मर्यादीत येथून शासकीय मोटारिने ति-हे ता. उत्तर सोलापूर येथील हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता ति-हे हेलिपॅड येथे आगमन व खाजगी हेलिकॉप्टरने खर्डी ता. पंढरपूरकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता खर्डी ता. पंढरपूर हेलिपॅड येथे आगमन. दुपारी 3.05 वाजता सिताराम महाराज कारखाना येथे आगमन व मा. मुख्यमंत्री महोदयांसमवेत कल्याणराव काळे, चेअरमन सिताराम महाराज साखर कारखाना मर्यादीतचा सन 2012-13 च्या प्रथम ऊस गळीत हंगामास उपस्थिती (स्थळ - खर्डी ता. पंढरपूर)  दुपारी 4.30 वाजता खर्डी ता. पंढरपूर येथून खाजगी हेलिकॉप्टरने बाणेर जि. पुणेकडे प्रयाण करतील.

 
Top