नळदुर्ग -: मतदान तुम्‍हाला केलो म्‍हणून हातात परडी घेवून शपथ घे, नाहीतर मतदान करण्‍यासाठी दिलेले पैसे परत दे, अशा प्रकारची निवडणुकीत वाटप केलेल्‍या पैशाची वसुली ग्रामपंचायत निवडणुकीत वाटप केलेल्‍या पैशाची वसुली ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झालेल्‍या उमेदवारांकडून सुरू असल्‍याचे दिसून येत आहे.
तुळजापूर तालुक्‍यात ग्रामपंचायत निवडणुका पार पाडल्‍या आहेत. काही किरकोळ घटना वगळता निवडणुका अतिशय शांततेत पार पडल्‍या. मात्र मतमोजणीनंतर निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार मतदारांना वाटलेल्‍या पैशाची वसुली करीत असल्‍याने काही गावांमध्‍ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्‍यासारखा पैसा खर्च करूनही पराभूत झालेले उमेदवार प्रचंड नाराज झाले आहेत.
सध्‍या मूर्टा (ता. तुळजापूर) या गावात निवडणुकीत पराभूत झालेले काही उमेदवार मतदारांना वाटलेल्‍या पैशाची वसुली करीत आहेत. त्‍याचबरोबर सध्‍या या ठिकाणी शेताला जाणारे रस्‍ते काटेरी फांद्या लावून अडविणे, असे प्रकार सुरू झाले आहेत. कॉंग्रेस पुरस्‍कृत सत्‍यवान सुरवसे यांच्‍या नेतृत्‍वाखाली गहिनीनाथ विकास पॅनलने सर्वपक्षीय पॅनलचा मोठ्या मताधिक्‍याने पराभव केला. गेल्‍या 40 वर्षात मूर्टा-मानेवाडी ग्रामपंचायतीच्‍या निवडणुकीत हे मताधिक्‍य सर्वाधिक आहे. सत्‍यवान सुरवसे यांच्‍या आजवर केलेल्‍या कार्याच्‍या जोरावर या पॅनलला घवघवीत यश मिळविता आले आहे. मतदारांना मोठ्याप्रमाणात पैसे वाटूनही मतदारांनी मतदान केले नाही. याचा राग मनात धरून पराभूत झालेले काही उमेदवार व त्‍यांचे समर्थक मतदारांकडून पैशाची वसुली करीत आहेत. ज्‍याला मतदान करण्‍यासाठी पैसे दिले, त्‍यांना आपल्‍यालाच मतदान केले की नाही, याची खात्री करून पाहण्‍यासाठी त्‍याच्‍या घरी जाऊन त्‍याच्‍या हातात परडी देवून मतदान मलाच केलेस, याबाबतची शपथ घेण्‍यास प्रवृत्‍त करीत असल्‍याचे चित्र दिसून येत आहे.
 
Top