उस्‍मानाबाद -: महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन (एसटी) महामंडळा च्‍यावतीने रविवार दि. 21 ऑक्‍टोबर रोजी राज्‍यात जिल्‍ह्याच्‍या ठिकाणी वाहक (कंडक्‍टर) पदासाठी लेखी परीक्षा घेण्‍यात आली. यावेळी बेरोजगारांची मोठ्याप्रमाणावर उपस्थिती होती. 
उस्‍मानाबाद येथील भोसले हायस्‍कूल सह इतर शाळेत असे मिळून चार ठिकाणी वाहक पदासाठी परीक्षा केंद्र उघडण्‍यात आले होते. परीक्षा संपल्‍यानंतर उमेदवारातून परीक्षेबद्दल जोरदार चर्चा होत आहे. मात्र या लेखी परीक्षेबद्दल परीक्षार्थींमधून नाराजीचा सूर अद्यापही उमटत आहे. राज्‍य परिवहन महामंडळाने वाहक पदासाठी अवघड प्रश्‍नपत्रिका काढून अनेक परीक्षार्थींची निराशा केल्‍याची चर्चा उमेदवारातून होत आहे.
 
 
Top