कुंभारी जवळील रोडवर अवैद्य दारूची जप्‍ती
मुरूम -: कंटेकुर ते मुरूम कडे जाणा-या रोडवर कुंभारी गावाजवळ दोघेजण विनापास परवाना देशीदारूच्‍या 48 बाटल्‍या घेवून जात असताना त्‍यांना पोलीसांनी अटक करून त्‍यांच्‍याकडून दारूच्‍या बाटल्‍या व मोटारसायकल असा 36 हजार 296 रूपयाचा मुद्देमाल जप्‍त केला. ही घटना दि. 24 ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी साडे सात वाजण्‍याच्‍या सुमारास घडली. 
              सचिन दत्‍तात्रय भालेराव (वय 36 वर्षे, रा. भिमनगर मुरूम), सुनिल ऊर्फ पप्‍पु मुदकन्‍ना (वय 30 वर्षे, रा. मुरूम) असे अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नावे आहेत. पोना प्रमोद जाधव यांनी दिलेल्‍या फिर्यादीवरून दारूबंदी कायद्यान्‍वये दोघांविरूद्ध मुरूम पोलीसात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

येणेगुर येथे बँकेची फसवणूक केलेल्‍या व्‍यक्‍तीविरूद्ध गुन्‍ह्याची नोंद
मुरूम -: खेड (ता. लोहारा) येथील सुधाकर नारायण इंगोले (वय 45 वर्षे, राजीव गांधी विद्यालय, खेड) यांनी दि. 19 मे 2006 रोजी बँक ऑफ महाराष्‍ट्र येणेगूर कडून लोहारा येथील सर्व्‍हे नंबर 153/2 मधील प्‍लॉट नं.27 मध्‍ये घरबांधणीसाठी 3 लाख रूपये कर्ज बँकेकडून घेतले होते. परंतु त्‍यांनी घर बांधकाम न करता खाजगी देणे दिले वगैरे वरून सुधाकर इंगोले यांनी बँकेची दिशाभूल करून फसवणूक केली असल्‍याची फिर्याद चंद्रकांत नाग (बँक ऑफ महाराष्‍ट्र शाखा येणेगूर) यांनी उमरगा न्‍यायालयात दिल्‍यावरून सुधाकर इंगोले यांच्‍याविरूद्ध दि. 24 ऑक्‍टोबर रोजी मुरूम येथे गुन्‍ह्याची नोंद करण्‍यात आली आहे.
           तसेच खेड (ता. लोहारा) येथील मधुकर हरिबा राठोड (वय 50 वर्षे) यांनी बँक ऑफ महाराष्‍ट्र येणेगूर येथील प्‍लॉट क्रं. 3155/02 हे घरबांधकामाकरीता दि. 2 मार्च 2007 रोजी सदरील बँकेकडून 2 लाख रूपये कर्ज घेतले व बांधकाम न करता खाजगी घेतलेल्‍या कर्जाची परतफेड करून बँकेची फसवणूक केली असल्‍याची फिर्याद चंद्रकांत नाग यांनी उमरगा न्‍यायालयात दिल्‍यावरून मुरूम पोलिसांत गुन्‍हा दाखल करण्‍यात आला असून पुढील तपास सपोफौ गुळवे हे करीत आहेत.

औसा ते उस्‍मानाबाद रोडवर टेम्‍पोची झाडास धडक दोन ठार
बेंबळी -: दि. 22 ऑक्‍टोबर रोजी रात्री साडे वाजण्‍याच्‍या सुमारास औसा ते उस्‍मानाबाद जाणा-या रोडवरून टेम्‍पो क्रमांक एमएच. 04 बीयु 1653 चा चालक सहदेव ऊर्फ अमोल तुकाराम कांबळे (वय 32 वर्षे, रा. पाडोळी आ) याने त्‍याचे ताब्‍यातील टेम्‍पो घेवून समुद्रवाणी कडून पाडोळीकडे येत असताना हयगयीने व निष्‍काळजीपणे भरधाव वेगात चालवून रोडच्‍या कडेला असलेल्‍या बाभळीचे झाडास जोराची धडक देवून स्‍वतः  गंभीर जखमी होवून मयत झाला व टेम्‍पोमधील गणेश शेषेराव गुंड (वय 35 वर्षे) यांनाही गंभीर जखमी करून मरणास व पदमाकर दासोबा गुंड (वय 35 वर्षे) यांना गंभीर जखमी करणेस कारणीभूत झालेल्‍या टेम्‍पो चालक मयत सहदेव कांबळे याच्‍याविरूद्ध शेषेराव शंकर गुंड यांनी बेंबळी पोलीस पोलिसांत दिल्‍यावरून गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रोकडे हे करीत आहेत.
 
Top