नळदुर्ग -: मुर्टा (ता. तुळजापूर) शिवारातून चिंचखोरी-मानमोडी या सहा किलोमीटर शेत रस्त्याच्या कामाचे शुभारंभ करण्यात आले. या शेतरस्त्याचा बहुतांश शेतकरी, ग्रामस्थांना सर्वाधिक फायदा होणार आहे. यावेळी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. 
               तुळजापूर तालुक्यातील मूर्टा शिवारात असलेल्या लक्ष्मी मंदीर ते चिंचखोरी तांडा-मानमोडी गावापर्यंत असे सहा किलोमीटर शेतरस्त्याच्या कामाचा शुभारंभ मुर्टा गावचे माजी सरपंच मधुकर सुरवसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी प्रगतशील शेतकरी तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सत्यवान सुरवसे, गोपाळ सुरवसे, दादासाहेब चौधरी, मोतीराम सुरवसे यासह शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top