उस्मानाबाद :- ज्या विनाअनुदानीत महाविद्यालयातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. त्या शिष्यवृत्तीची देयके ३० ऑक्टोबर पर्यंत पारीत करुन शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फीचे वितरण संबंधित अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना व संबंधित महाविद्यालयाना ई.सी.एस.द्वारे करावे अशा सूचना समाज कल्याण आयुक्त, महाराष्ट्र राज्य्‍ा यांनी सर्व संबंधित जिल्ह्यांच्या सहायक आयुक्तांना दिल्या आहेत. 
दरम्यान विना अनुदानीत महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या अर्जास ऑनलाईन मान्यता देवून अर्ज संबंधित जिल्ह्यांचे सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण यांच्याकडे न पाठविल्यामुळे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृती तसेच संबंधित महाविद्यालयांना शिक्षण फी व परिक्षा फी मिळण्यास विलंब झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांची राहील,असे सहायक आयुक्त समाजकल्याण, उस्मानाबाद  यांनी कळविले आहे. 
                   
* कारखानदारांना आवाहन 
उस्मानाबाद -: प्रत्येक कारखान्याच्या भोगवटादाराने महाराष्ट्र कारखाने नियमावली 1963 च्या नियम 8 अन्वये सन 2013 या वर्षाकरिता परवाना नुतनीकरणासाठी नमुना क्रं. 2 मध्ये दि. 31 ऑक्टोबर 2012 पूर्वी उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, 19, यशोदीप, एच.आय.जी. कॉलनी, आय.टी.आय. जवळ, नांदेड (दुरध्वनी क्र. 02462- 252156) या कार्यालयाकडे अर्जकरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top