सोलापूर -: अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे बाहुल्य असलेल्या शासन मान्यताप्राप्त खाजगी शाळा कनिष्ठ महाविद्यालये व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी - सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सन २०१२-१३ अल्पसंख्यांक अनुदान योजनेंतर्गत जिल्हाधिकारी यांचेकडे प्रस्ताव सादर करण्याची मुदत ३० सप्टेंबर २०१२ पर्यंत करण्यात आली होती मात्र शासनाच्या आदेशानुसार ही मुदत आता ३० ऑक्टोबर २०१२ पर्यंत वाढविण्यात येत आहे. मात्र या मुदतवाढीनंतर आलेले प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी, शशिकांत म्हेत्रे यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.