सोलापूर :- जिल्हा वार्षिक योजनेच्या सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात लहान गटाच्या प्राप्त प्रस्तावातील ३०८ कोटी ६० लाख रुपयांच्या नियतव्यास मंजुरी देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आज सर्वश्री आमदार दिलीप सोपल व दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या लहान गटाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, जिल्हा नियोजन अधिकारी शशीकांत म्हेत्रे उपस्थित होते.
आर्थिक वर्ष २०१३-१४ करीता जिल्हा नियोजन समितीस ३०८ कोटी ६० लाख रुपयांच्या मंजुर नियतव्यामधुन गाभा क्षेत्रासाठी १६२ कोटी २८ लाख, बिगर गाभाक्षेत्रासाठी ७६ कोटी ३२ लाख तर अतिरिक्त ७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या बैठकीस सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.