सोलापूर दि. 22 : मुख्यालय 3 ई.एम.ई. सेंटर भोपाळ येथे दिनांक 5 नोव्हेंबर 2012 ते 25 नोव्हेंबर 2012 या कालावधीत आजी सैनिक, माजी सैनिक, विधवा व युध्द विधवा यांचे पाल्य व सेवारत / माजी सैनिकांचे सख्ये भाऊ यांच्या भरतीसाठी युनिट कोटा सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. भरती मेळाव्यामध्ये सोल्जर जी.डी, सोल्जर टेक्नीकल व सोल्जर ट्रेडसमनची भरती करण्यात येणार आहे.
            सोल्जर जी.डी. साठी उमेदवाराचे वय 17 1/2 ते 21 वर्षे असावे. सोल्जर टेक्नीकल व सोल्जर ट्रेडसमनसाठी उमेदवाराचे वय 17 1/2 ते 23 वर्षे असावे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांचेशी संपर्क साधावा. तरी सोलापूर जिल्ह्यातील आजी - माजी सैनिक विधवा व युध्द विधवांच्या पाल्यानीं या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.
 
Top