परंडा -:  येथील विवाहित महिलेस सासरच्‍यांनी संगनमत करून मुलबाळ न झाल्‍याच्‍या कारणावरून सतत शिवीगाळ व मारहाण केल्‍याप्रकरणी चार जणांविरूद्ध परंडा न्‍यायालयाच्‍या आदेशाने परंडा  पोलीस ठाण्‍यात गन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.
               पंडीत दामु बल्‍ल्‍याळ, सौ. शेषनाबाई दामु बल्‍ल्‍याळ, नागरबाई रावसाहेब चव्‍हाण, भाऊसाहेब रावसाहेब चव्‍हाण (सर्व रा. आरणगाव, ता. परंडा) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींचे नावे आहेत. यातील सौ. शारदा बल्‍ल्‍याळ या विवाहित महिलेस सतत शिवीगाळ व मारहाण करून उपाशी ठेवून तू सोडचिठ्ठी दे नाही तर माहेरहून एक लाख रूपये घेऊन ये, म्‍हणून सतत शारीरिक व मानसिक त्रास दिल्‍याची फिर्याद सौ. शारदा बल्‍ल्‍याळ यांनी परंडा न्‍यायालयात दिल्‍याने वरील आरोपीविरूद्ध न्‍यायालयाच्‍या आदेशाने परंडा पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चौरे हे करीत आहेत.

तामलवाडी -: विवाहितेस माहेरहून ट्रक,  सोन्‍याची अंगठी व इतर साहित्‍य आणण्‍यासाठी सतत शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करून जाचहाट केल्‍याप्रकरणी एकाविरूद्ध पोलिसांत गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.
             दादाराव शिवाजी पवार (वय 42 वर्षे, रा. शांतीनगर बंगला, कावेरी कॉलनी, ठाणे पूर्व) असे गुन्‍हा नोंद झालेल्‍या आरोपीचे नाव आहे.  सौ. शर्मिला दादाराव  पवार (रा. 35 वर्षे) यास तिचा पती सतत शिवीगाळ करून मानिसक व शारीरिक छळ करत असे, अशी फिर्याद शर्मिला पवार यांनी तुळजापूर न्‍यायालयात फिर्याद दिल्‍यावरून त्‍याच्‍या पतीविरूद्ध तुळजापूर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ ओहळ हे करीत आहेत. 
 
Top