ढोकी -: मौजे तडवळा (कसबे) येथील सौ. विद्या विजय सोनटक्‍के (वय 30 वर्षे) यास तिचा पती विजय बबन सोनटक्‍के  (वय 35 वर्षे, रा. तडवळा) यांनी माहेरहून मोटारसायकल घेण्‍यासाठी व घर बांधण्‍यासाठी एक लाख रूपये घेऊन ये, असे म्‍हणून सतत शिवीगाळ व मारहाण करून जाचहाट करून त्रास दिला, या त्रासास कंटाळून विद्या सोनटक्‍के याने दि. 17 ऑक्‍टोबर रोजी विषारी औषध पिवुन आत्‍महत्‍या केली. याप्रकरणी विजय सोनटक्‍के याच्‍याविरूद्ध ढोकी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीथक कांबळे हे करीत आहेत.
 
Top