उस्मानाबाद –: तुळजापूर येथील 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे उदघाटन आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले.
यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, सहकार व पणनमंत्री हर्षवर्धन पाटील, पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, खा. डॉ. पद्मसिंह पाटील, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. बसवराज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, विभागीय आयुक्त्संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे आणि लातूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. अशफाक अहमद यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली.
उपजिल्हा रुग्णालयामध्ये स्त्री-रुग्ण कक्ष, बालरुग्ण कक्ष, दंत व नेत्र चिकित्सा कक्ष, क्ष-किरण कक्ष, शस्त्रक्रिया विभाग, आयुष कक्ष, बालरुग्ण कक्ष, औषण वितरण कक्ष रुग्णांसाठी कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. अशफाक अहमद यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिली. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
