मुंबई -: सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या 52 व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेची सुरूवात 19 नोव्हेंबर पासून होत असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
हौशी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी 20 केंद्रांवर आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत 226 नाट्य संस्था सहभागी होणार आहेत. या वर्षापासून राज्य नाट्य स्पर्धेत तीन वर्षाच्या आतील संहिता सादर करण्याची अट शिथील करण्यात आली आहे. नवीन नाट्य संहितांना पाच गुण अधिक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर नाट्य प्रशिक्षण देणाऱ्या महाविद्यालयातील नाट्य विभागांना सामावून घेण्याचा निर्णयही यावर्षी घेण्यात आला आहे.