मुंबई : राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.  
राज्यपाल आपल्या शोकसंदेशात म्हणतात, बाळासाहेब ठाकरे अफाट लोकप्रियता असलेले लोकनेते होते. त्यांच्या निधनाने प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीस दु:ख झाले आहे. पाच दशकांहून अधिक काळ त्यांचे राजकीय जीवनावर वर्चस्व होते. राष्ट्रीय संबंधित विषयांवरील त्यांच्या विचारांचा आणि मतांचा आदर केला जात होता. राज्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणाबाबत त्यांचा स्पष्ट दृष्टीकोन होता. गरीब जनतेबाबत त्यांना कळवळा होता आणि जनतेच्या न्यायिक मागण्यांसाठीही ते झटले.  बाळासाहेब हे सहृदयी व्यक्तीमत्व होते. सर्वच राजकीय पक्षांमध्ये त्यांचे मित्र होते. त्यांच्या निधनाने न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे, असेही राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

 
Top