सोलापूर :- युरोपीयन देशांना द्राक्ष निर्यात करु इच्छिणारे द्राक्ष बागायतदारांना द्राक्ष बागेची नोंदणी करण्याची मुदत दि. 30 नोव्हेंबर 2012 पर्यंत असुन विहित प्रपत्रातील फॉर्म व प्रति प्लॉट रु. 50/- याप्रमाणे रकमचे चलन भरुन द्राक्ष बागेची नोंदणी करावी व ज्या लाभार्थीचे गॅप सर्टिफिकेट आहे अशा लाभार्थींना राष्ट्रीय फलोत्पादन अभियान मधुन प्रति प्रमाणपत्र रुपये पाच हजार (रु.5000/-) अनुदान मिळणार आहे.
तरी जास्तीत जास्त लाभार्थींनी नोंदणी करुन या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक किरनळ्ळी यांनी शेतक-यांना केले आहे