सोलापूर -: राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. मधुकरराव चव्हाण  हे सोलापूर  दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
          गुरुवार दि 23 नोव्हेंबररोजी सकाळी 7.05 वाजता मुंबई येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने सोलापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने उस्मानाबादकडे प्रयाण, शनिवार दिनांक 24 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 1 वाजता अणदूर ता. तुळजापूर येथून शासकीय वाहनाने कराड जि. साताराकडे प्रयाण. रविवार दि. 25 नोव्हेंबर रोजी सोईनुसार सोनसळ ता. कडेगांव जि. सांगली येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह सोलापूरकडे प्रयाण, आगमन व राखीव व मुक्काम. 
            सोमवार दि. 26 नोव्हेंबर  रोजी सकाळी 10 वाजता दक्षिण भारत जैन समाज यांचेवेतीने आयोजित पुरस्कार वितरण समारंभास उपस्थिती (स्थळ - श्राविका संस्थानगर, सम्राट चौक, सोलापूर) दुपारी 12 वाजता सोलापूर येथून शासकीय वाहनाने उस्मानाबादकडे प्रयाण. सांयकाळी 5.45 वाजता अणदूर येथून सोलापूरकडे प्रयाण शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आगमन व राखीव. रात्रौ 10.45 वाजता सोलापूर येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.


* पालकमंत्री मधुकरराव चव्हाण उस्‍मानाबाद जिल्हा दौ-यावर

उस्मानाबाद -: राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे जिल्हा दौ-यावर असून  त्यांच्या कार्यक्रमांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
               गुरुवार, दि. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 7-05 वाजता सोलापूर येथून  अणदूर ता. तुळजापूरकडे प्रयाण.  सकाळी 8-05  वा. अणदूर येथे आगमन व राखीव. स. 11 वा. अणदूरहून तुळजापूरकडे प्रयाण.  स. 11-30 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व  राखीव. दुपारी 12-30 वा. तुळजापूर येथून उस्मानाबादकडे प्रयाण. दुपारी 1 वा. शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. सोईनूसार शासकीय वाहनाने अणदूरकडे प्रयाण, राखीव व मुक्काम. 
           शुक्रवार, दि. 23  रोजी सकाळी  9 वा. रोजी अणदूर येथून पाथ्रुड,ता. भूमकडे प्रयाण,  स. 11 वा. पाथ्रुड येथे आगमन. जिल्हा परिषदअंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा नळ येाजनेच्या  उदघाटन समारंभास उपस्थिती.  स्थळ- पाथ्रुड.  दुपारी 1 वा. उस्मानाबाद येथे आगमन. सर्किट हाऊस उस्मानाबाद येथे आयोजित जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थिती व पाणीटंचाई कामाची आढावा बैठकीस उपस्थिती व सोईनूसार अणदूर ता. तुळजापूरकडे प्रयाण. राखीव व मुक्काम. दि.24 रोजी अणदूर ता. तुळजापूर येथे राखीव. दुपारी 1 वा. अणदूर ता. तुळजापूरहून  कराड, जि. साताराकडे प्रयाण. 
 
Top