नांदेड : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबद्दल नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री डी.पी.सावंत यांनी तीव्र दुख: व्यक्त केले आहे.
श्री.सावंत यांनी शोकसंदेशात म्हटले आहे, महाराष्ट्रातील जनमानसावर मोहिनी घालणारा कुशल अनुभवी संघटक नेता महाराष्ट्राने गमावला आहे. व्यंगचित्राद्वारे बाळासाहेबांनी सर्व प्रकारच्या बेगडीपणावर कठोर प्रहार केले. बाळासाहेब हे निश्चितपणे एक प्रभावी व्यक्तीमत्व होते. जनता ही त्यांच्या व्यंगचित्रांना विसरु शकणार नाही. महाराष्ट्रातील राजकारण बाळासाहेबांच्या भूमिकांमुळे प्रभावित झालेले होते. बाळासाहेबांचे व्यक्तीमत्व महाराष्ट्रातील जनतेच्या निरंतर स्मरणात राहील. एक वादळी व झंझावती व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली व्यक्त करतो.