मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने महाराष्ट्राचे आणि प्रामुख्याने मराठी माणसाचे अपरिमित नुकसान झाले आहे. लोकमनावर अधिराज्य गाजवणारा लोकनेता हरपला आहे, अशा शब्दात वित्त मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
लोकांच्या मनात घर करुन राहिलेले लेखन, भाषणे आणि व्यंगचित्रे यातून राज्याचे, मराठी माणसाचे हित जपले गेले. त्यांच्या प्रत्येक कृतीतून लोकभावनेला अग्रस्थान मिळाल्याचे जाणवते, असेही त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.