मुंबई : शून्यातून संघटना सामर्थ्य निर्माण करणारे कुशल संघटक, राजकीय विसंगतीवर मार्मिक भाष्य करणारे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आणि लाखो श्रोत्यांच्या सभांना आपल्या ओजस्वी वाणीने मंत्रमुग्ध करणारे दशसहस्त्रेषू असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना लाभले होते. अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
वळसे-पाटील आपल्या शोकसंदेशात म्हणतात, आपली परखड राजकीय मते तितक्याच जोरकसपणे मांडण्याची त्यांची शैली खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण होती. प्रत्येक शिवसैनिकाशी ते भावनिक नात्याने जोडले गेले होते. त्यामुळेच शिवसेनेचा एक संघटना व राजकीय पक्ष म्हणून विस्तार होऊ शकला. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचा एक थोर सुपुत्र आपल्यातून निघून गेला आहे.