मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने महाराष्ट्राचे अपरिमित नुकसान झाले आहे. राजकीय नेता, व्यंगचित्रकार, वक्ता, संघटक असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. लोकमनावर अधिराज्य गाजविणारा लोकनेता हरपला आहे. अशा शब्दात विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
बेधडक वक्तृत्व, कमालीचा स्पष्टवक्तेपणा कोणाचीही मुलाहिजा न ठेवता केलेली टीका ही त्यांच्या भाषणाची प्रमुख वैशिष्ट्ये असत. लोकांच्या मनात घर करुन राहिलेले लेखन, भाषणे आणि व्यंगचित्रे यातून त्यांनी राज्याचे हित जपले. त्यांनी आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी भल्या-भल्यांना जेरीला आणले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका थोर नेतृत्वास मुकला आहे, अशा शब्दात शिवाजीराव देशमुख यांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे.