मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने महाराष्ट्रानेच नव्हे तर देशाने एक पितृतुल्य व्यक्तिमत्व गमावले आहे, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी व्यक्त केली आहे.
          पाटील यांनी शोकसंदेशात म्हटले आहे, बाळासाहेब ठाकरे यांनी प्रदीर्घ काळ मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजविले. रोखठोक स्वभाव आणि सडेतोड लेखन करणारे एक ज्येष्ठ पत्रकार, संपादक तसेच सामाजिक, राजकीय अनिष्ट प्रवृत्तींवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून 'फटकारे' लगावणारे बाळासाहेब ठाकरे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. प्रबोधनकारांचा वारसा नेटाने पुढे चालविणाऱ्या बाळासाहेबांचे सर्वच राजकीय पक्षांशी निकटचे संबंध होते. त्यांच्या निधनाने एक वडीलधारे व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज गमावला आहे, अशा शब्दात श्री.पाटील यांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे.
 
Top