बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: महाराष्ट्र व गोवा विभागात होणा-या श्रीदत्त समाज, श्रीरंग कला निकेतन, तळेगाव दाभाडे, पुणे आयोजित संगीत भूषण कै. राम मराठे स्मृती गायन स्पधेकरीता लहान गट व मोठा गटात दि. 15 व 16 रोजी झालेल्या निवड फेरीत बार्शीच्या सौम्या गजानन सोपल, चिन्मयी गजानन सोपल यांच्यासह 16 जणांची निवड करण्यात आली आहे.
यात शास्त्रीय गायन, तंतुवाद्य वादन, मराठी सुगम संगीत, नाटय संगीत, संवादिनी (हार्मोनियम वादन), तबला/पखवाज वादन आदी प्रकारात पुणे येथे दि. 23 ते 25 डिसेंबर रोजी अंतिम फेरीच्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी बार्शी केंद्रात सोलापूर, पंढरपूर, सांगोला, उस्मानाबाद, परंडा आदी भागातील संगीताचे ज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांसाठी निवड फेरी ठेवण्यात आली होती. यात 50 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे नावे पुढीलप्रमाणे : शास्त्रीय गायन (लहान गट) मानसी पानसे, नाटयसंगीत (लहान गट) सौम्या सोपल, मानसी पानसे, (खुला गट) प्रतिक सलगर, प्रसाद ख्रिस्ते, सुगम गायन (बाल गट) चिन्मयी सोपल, सौम्या सोपल, (युवा गट) पौर्णिमा अडगळे, मधुरा पानसे, (पौढ गट) प्रसाद ख्रिस्ते, पंढरपूर, (ज्येष्ठ गट) सौ. स्वाती डोळे, हार्मोनियम वादन (लहान गट) चिन्मयी सोपल, श्रेया भट, (मोठा गट) तमदुन पठाण, तबला वादन शुभंकर दामोदरे, पंढरपूर, हर्षल देशमुख यांना स्पर्धेसाठी निवडपत्र, प्रमाणपत्र गौरविण्यात आले.
या फेरीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षक म्हणून पुणे येथील श्री शरद जोशी यांनी काम पाहिले तर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून संगीत विशारद प्रा.सौ. अबोली सुलाखे, संतोष शिंदे, सुनिल नागटिळक, कृष्णा खांडेकर, उमा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशन आयोजित मास्टरमाईंड व पब्लिसिटी स्टार बॅटल स्पर्धेकरीता महाराष्ट्रात सात जणांची निवड करण्यात आली. हार्मोनियमध्ये बार्शीचया चिन्मयी सोपल हिची पुणे येथे दि. 23 डिसेंबर रोजी होणा-या दुस-या फेरीसाठी निवड करण्यात आली.