ढाका -: बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रामात पाकिस्तानी सैनिकांनी प्रचंड अत्याचार केले होते. तब्बल 4.5 लाख महिलांवर पाकिस्तानी सैनिकांनी बलात्कार केला होता. एका अभ्यासानंतर हे वास्तव उघडकीस आले आहे. बांगलादेशच्या महिलांसाठी 1971 हे संपूर्ण वर्षच काळे ठरले. या माहितीनुसार, मार्च 1971 मध्ये 18,527 महिलांवर बलात्कार झाला. तर एप्रिलमध्ये 35 हजार, मे महिन्यात 32 हजार, जूनमध्ये 25 हजार, जुलैमध्ये 21 हजार, ऑगस्टमध्ये 12 हजार, सप्टेंबरमध्ये 15 हजार, ऑक्टोबरमध्ये 19 हजार, नोव्हेंबरमध्ये 14 हजार आणि डिसेंबरमध्ये 11 हजार महिलांवर बलात्कार झाला होता. बांगलादेश युद्धाशी संबंधित मंत्रालयाच्या स्थायी समितीचे संयोजक डॉ. एम. हसन यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, 42 जिल्ह्यातील 85 पोलिस ठाण्यांचा सर्वेक्षण करण्यात आले. तसेच 267 लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातून अनेक खळबळजनक निष्कर्ष समोर आले. सुमारे 9 महिने चाललेल्या मुक्ती संग्रामात 4 लाख 50 हजारांपेक्षा जास्त महिलांवर बलात्कार करण्यात आला. बलात्काराच्या बळी पडलेल्या महिलांमध्ये 56.50 टक्के महिला मुस्लिम, 41.44 टक्के हिंदू आणि 2.06 टक्के महिला इतर धर्माच्या होत्या. डॉ. हसन म्हणाले, यापैकी बहुतांश महिला विवाहित होत्या.