बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : तुळजापूरहुन  कुर्डुवाडीकडे जाणा-या बोलेरो कारमधुन  गांजाची चोरटी वाहतुक  करत असताना पोलीसानी  शितीफीने सुमारे 1 लाख रूपये किंमतीचा गांजा जप्‍त केला. यावेळी गांजाची तस्‍करी करणा-या तिघा आरोपीना पोलीसानी ताब्‍यात घेतले. वाहनचालक फरार झाला आहे. ही घटना बार्शी येथील पोस्‍ट ऑफिस चौकात घडली.
    बिसू सरकार राजन (वय 25, रा. पालपरा, जि. बाबुपारा, आसाम), अरविंद अशोक सोनी (वय 20, रा. धवारी मोहल्‍ला वार्ड नं. 36, गल्‍ली नं. 9 जि. सतना, मध्‍यप्रदेश), नामदेव अनंत पाटील (वय 18, रा. रवसमांडवा, ता. वडकळ, पेन जि. रायगड) असे अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपींचे नावे आहेत. बोलेरो (क्र. एम.एच. 23 एक्‍स 313) या वाहनातून गांजाची वाहतूक होत असल्‍याची माहिती पोलीसानी मिळाली. त्‍यानुसार पोलीस अधिक्षक राजेश प्रधान, अप्‍पर पोलीस अधिकारी तुषार दोशी यांच्‍या मार्गदर्शनाखली पोलीस निरीक्षक गजेंद्र मनसावले यांनी सापळा रचून पोलीस उपनिरीक्षक युवराज खाडे, हवालदार अन्‍वर मुजावर, मनोज भोसले, सिताराम माने, सुरज हेबाडे, रविंद्र बाबर, संजय चंदनशिवे, विशाल घाटके, दशरथ गोरे, गणेश पवार, शरद चव्‍हाण यांच्‍यासह इतर पोलीस कर्मचा-यांनी बार्शी येथील पोस्‍ट ऑफिस चौकात  एक  लाख रूपये किंमतीचा  गांजा व 4 लाख रूपये किंमतीची बोलेरो असे मिळून सुमारे पाच लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसानी जप्‍त करून तिघां आरोपींना गजाआड केले आहे. याप्रकरणी  बार्शी पोलीसात  गुन्‍हा दाखल करण्‍यात आला असुन पुढील तपास  उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिदास पवार हे करीत आहेत.

 
Top