वाशी -: एका वीस वर्षीय महिलेचा ती घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन एका वृध्दाने तिचा विनयमभंग केल्याची घटना दि. 16 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव (क) ता. वाशी येथे घडली. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
काशिनाथ रामराव गव्हाणे (वय 60 वर्षे, रा. पिंपळगाव (क) ता. वाशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. यातील काशिनाथ गव्हाणे हा येथील एक 20 वर्षीय महिला तिच्या घरी एकटी असल्याचे पाहून पिण्यासाठी पाणी मागण्याचा बहाणा करून वाईट हेतूने तिचा हात धरुन विनयभंग केल्याची फिर्याद सदरील महिलेने दि. 18 डिसेंबर रोजी वाशी पोलीसात दिली. त्यावरून काशिनाथ गव्हाणे यास अटक करून त्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार चौधरी हे करीत आहेत.