नवी दिल्ली -:  गेल्या 13 दिवसांपासून मृत्यूशी संघर्ष करत असलेल्या दिल्लीतील गॅंगरेप पीडित २३ वर्षीय तरुणीचा अखेर मृत्यू झाला. सिंगापूरमधील माउंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये         तिच्यावर उपचार सुरु होते.  मध्यरात्री सव्वा दोन वाजता तिचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने जाहीर केले. अवयव निकामी झाल्यामुळे पीडित तरुणीचा मृत्यू झाल्याचेही वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.  तरुणीच्या मृत्यू झाल्यानंतर दिल्लीत सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
           प्रकृती सातत्याने खालावत असल्यामुळे पीडित तरुणीला सफरगंज रूग्णालयातून सिंगापूरला हलविण्यात आले होते. तिला वाचविण्यासाठी तेथील डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले परंतु ते निष्फळ ठरले. सिंगापूर येथील रुग्णालयात दाखल करण्याआधीच पीडित तरुणीचे अवयव निकामी होण्यास सुरुवात झाली होती. प्रकृती सातत्याने खालावत असल्यामुळे अवयव प्रत्यारोपण करुन तिला वाचवणे अशक्य झाले होते. पीडित तरुणीची प्रकृती शुक्रवारी खूपच खालवली होती. तिचे अवयव निकामी झाले होते. उपचाराला ती सकारात्मक प्रतिसाद देत नव्हती. तरुण‍ीचा मृत्यू झाला तेव्हा तिचे आई-वडील आणि भाऊ तिच्यासोबत होता.

आरोपींना फाशीची ‍शिक्षा द्यावी
        16 डिसेंबर रोजी दिल्लीत एका धावत्या बसमध्ये या तरुणीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या आणि तिच्या मृत्यूसही कारणीभूत ठरलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षा ममता शर्मा यांनी केली आहे.
 (साभार - दिव्‍य मराठी )
 
Top