बार्शी -: येथील भाजीमंडई परिसर व इतर ठिकाणी महिलांच्‍या पर्समधील अथवा पिशवीतील मौल्‍यवान वस्‍तू चोरीला जाण्‍याचे प्रमाण वाढले होते. वैराग येथील कोमल ज्ञानदेव ढाकणे या महिलेने तिच्‍या चोरीबाबत फिर्याद दाखल केल्‍यानंतर पोलीसानी त्‍याबाबत तपासासाठी योजना आखली होती. दरम्‍यान भिमनगर येथील धनश्री घोलप यांच्‍या पिशवीतून वस्‍तू चोरताना दोन महिलांना पोलीसानी रंगेहाथ पकडले. महिला पोलिसांनी त्‍या महिलांची झडती घेतल्‍यावर तिच्‍याकडे ब्‍लेड, सोन्‍याचा बदाम व रोख रक्‍कम मिळाली असून त्‍यांना अटक करण्‍यात आली आहे. या दोन महिला आरोपींना न्‍यायालयात उभे केले असता न्‍यायाधीशाने बुधवार दि. 26 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश दिले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरविंद घोडके हे करीत आहेत.
 
Top