इंफाळ -: देशाच्या राजधानीमध्ये वाढलेल्या बलात्काराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. तरीही देशात महिलांवर अत्याचार घटलेले नाहीत. मणिपूरमध्ये एका अभिनेत्रीचा विनयभंग झाला. या घटनेच्या निषेधासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यात पोलिसांच्या गोळीबारात एका पत्रकाराचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये अभिनेत्रीचा विनयभंग झाला होता. त्याच्या निषेधार्थ इंफाळमध्ये आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी काही वाहनांना जाळण्याचा प्रयत्न झाला. अखेर पोलिसांनी गोळीबार केला. त्यात या पत्रकाराला दोन गोळ्या लागल्या. एक गोळी थेट हृदयातच शिरली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. हा पत्रकार प्राईम न्यूज नावाच्या वाहिनीसाठी काम करीत होता. तसेच दूरदर्शनसाठी स्ट्रींजर म्हणूनही तो काम करायचा.
देशभरात उद्रेक झाला असूनही बलात्काराच्या घटना सुरुच आहेत. पतिला शोधण्यासाठी आलेल्या एका नेपाळी महिलेवर मुंबईत 3 वेळा बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. तर मध्य प्रदेशमध्ये बलात्काराच्या दोन घटना समोर आल्या आहेत. एक घटना विदिशामध्ये तर दुसरी घटना राजगढमध्ये झाली. राजगढमध्ये तर तक्रारची दखल न घेतल्यामुळे पीडितेने विष घेऊन आत्महत्या केली.
* सौजन्य दिव्य मराठी