मुंबई -: उद्योग संचालनालयामार्फत सन 2011-12 या वर्षाकरीता उत्कृष्ठ निर्यातदार राज्यस्तरीय पुरस्कार योजना राबविण्यात येणार आहे. निर्यातदार या योजनेत सहभागी होऊ शकतील अशा इच्छुक निर्यातदारांनी दिनांक 31 डिसेंबर 2012 पर्यंत आपले अर्ज उद्योग संचालनालयाकडे पाठवावेत, असे सचिव, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग तथा विकास आयुक्त (उद्योग) राधिका रस्तोगी यांनी कळविले आहे.
महाराष्ट्रात कार्यरत असलेले सूक्ष्म, लघु, मध्यम व मोठे उद्योग, एक्सपोर्ट हाऊस, मर्चंट हाऊस, ज्यांची निर्यात सन 2011-12 मध्ये 2 कोटी रुपया पेक्षा जास्त आहे, ज्यांनी इंटरप्रीन्युअर मेमोरंडम दाखल केलेले आहेत, त्याच प्रमाणे ज्यांनी निर्यातीचे चार्टर्ड अकाऊंटचे मागील 3 वर्षाची प्रमाणपत्रे सादर केलेली आहेत असे निर्यातदार या योजनेत सहभागी होऊ शकतील.
सन 2011-12 या वर्षाकरिता पुरस्कार देण्यात येणार असलेले प्रवर्ग व पुरस्कार संख्या अनुक्रमे पुढील प्रमाणे आहेत. सूक्ष्म/लघु उद्यम-14, मोठे उद्यम-11, लघु उद्योगांकरिता विभागीय पुरस्कार-6 तसेच मर्चंट निर्यात गृह, मान्यताप्राप्त निर्यात गृह, ट्रेडींग हाऊस, राज्यस्तरीय महामंडळे, सेवा निर्यातदार यांना प्रत्येकी 1 याप्रमाणे पुरस्कार देण्यात येणार आहे.
या योजनेची माहिती, अर्जाचा नमूना व पात्रतेच्या अटी महाराष्ट्र शासनाच्या www.maharastra.gov.in या संकेतस्थळावर तसेच संबंधित जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय व विभागीय कार्यालयात उपलब्ध आहेत. कार्यालयाचा पत्ता विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, 2 रा मजला, नवीन प्रशासन भवन, मंत्रालयासमोर, मुंबई-400 032 असा आहे.
अधिक माहितीसाठी पी.डी रेंदाळकर, उद्योग उपसंचालक (निर्यात प्रचालन शाखा) यांच्याशी दूरध्वनी क्रमांक: 022-2283 1902, फॅक्स क्रमांक 022-02202 6826 व ई मेल diexport@maharashtra.gov.in यावर संपर्क साधावा.