मुंबई -: जगभरातील साईभक्तांना ऑनलाईन सुविधेद्वारे घरबसल्या साईंच्या दर्शनाचे व खोल्यांचे आगाऊ आरक्षण करता यावे तसेच संस्थानमार्फत पुरविण्यात येणा-या सर्व सुविधांचा लाभ मिळावा याकरीता श्री साईबाबा संस्था विश्वस्त व्यवस्था (शिर्डी) च्यावतीने सुमारे बावीस कोटी रुपये खर्च करुन `साईटेक` प्रकल्पाची उभारणी केली असून online.sai.org.in या संकेतस्थळावर दर्शन, आरती व खोल्यांचे आरक्षणाची सुविधा उपलब्ध झाली असल्याची माहिती संस्थानचे कार्यकारी अधिकारी किशोर मोरे यांनी दिली.
मोरे म्हणाले की, साईटेक हा प्रकल्प कॉग्नीझंट टेक्नॉलॉजी सोलुशन्स, पुणे हे करत असून या प्रकल्पात देशभरातील इतर मंदिरांच्या तंत्रज्ञानापेक्षा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. या प्रकल्पामुळे जगभरातील साईभक्तांना ऑनलाईन सुविधेद्वारे घरबसल्या साईंच्या दर्शनाचे व खोल्यांचे आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे साईभक्तांच्या वेळेची बचत होवून गर्दीचेही नियंत्रण करता येणे शक्य झाले आहे. शिर्डीत आलेल्या साईभक्तांना संस्थान मार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभ एकाच ठिकाणाहून घेता येवून इंटरनेटद्वारे संस्थानच्या विविध उपक्रमांसाठी देणगी देणेही सुलभ झाले आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हा प्रकल्प उभारण्यात आलेला असल्याने साईभक्तांना सर्व सेवा कमी वेळेत विनासायास मिळतात. या प्रकल्पाअंतर्गत शिर्डीत विविध ठिकाणी कियॉस्क (टचस्क्रिन) ही कार्यप्रणाली बसविण्यात येणार असून त्याद्वारे साईभक्तांना संस्थानमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांची माहिती, विविध उपक्रम, संस्थानची प्रकाशने, मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम आदी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याचे मोरे यांनी सांगितले.