सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यातील हॉटेल / क्लब / परमिटरुम / बिअरबार चालकांनी नवीन वर्षाच्या आगमनाप्रित्यर्थ दि. 31 डिसेंबर 2012 रोजी डिस्कोथेक / कॅब्रे किंवा इतर विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम अंतर्गत तरतुदीनुसार सोलापूर महानगरपालिका हद्दीमध्ये पोलीस आयुक्त सोलापूर व उर्वरित ग्रामिण भागासाठी जिल्हादंडाधिकारी सोलापूर यांच्याकडुन नियमानुसार परवानगी घेऊनच कार्यक्रम आयोजित करण्याचे जिल्हादंडाधिकारी गोकुळ मवारे  यांनी कळविले आहे.
      रंगभूमी  परिनिरीक्षण मंडलाचा दाखला ध्वनीप्रदुषण व अन्य नियमांचे पालन करण्याच्या अटीवर करमणूक कर विभागाकडुन प्रमाणपत्र घ्यावे. सदर प्रमाणपत्र हे मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील नियम 137 व 138 (2) मधील तरतुदी, रंगभूमि परिनिरीक्षण मंडल यांचेकडील 2 जुलै 2005 चे आदेशातील तरतुद व द रुल फॉर लायसेन्सिंग अँड कंट्रोलिंगच्या प्लेसेस ऑफ  अम्युझमेंट 1960 यानुसार परवाने दिले जातात.
      मुंबई करमणूक शुल्क अधिनियम 1923 मधील कलम 3(1)(ब) अन्वये ग्राहकांना पुरविल्या जाणा-या खाद्यपदार्थ व मद्यपेयाच्या एकुण रक्कमेच्या 50 टक्के रक्कमेवर सध्या प्रचलित करमणूक शुल्क दराने शुल्क शासन जमा करणे आवश्यक आहे.  अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित करणारे चालकाने प्रवेशासाठी विश्चित केलेल्या रकमेची प्रवेश तिकीटे करमणूक कर कार्यालयाकडुन पूर्वमंजूरी घेणे आवश्यक आहे.
         विनापरवाना मनोरंजानाचे कार्य्रकम आयोजित करणा-या चालकाविरुध्द नियमानुसार करमणूक शुल्क वसुल करणे संदर्भात व विनापरवाना कार्यक्रम आयोजित केलेबद्दल कारवाई करणेत येईल.

 
Top