उस्मानाबाद : बचतगटांना नवनवीन कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध होण्यासाठी  एक किंवा अनेक बचतगटांनी एकत्रित येऊन कर्ज प्रकरण प्रस्ताव सादर करावीत, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी समितीचे अध्यक्ष एस. एल. हरिदास यांनी गटविकास अधिकारी व संबंधित यंत्रणेला दिले. 
          येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सभागृहात आयोजित कार्यकारी समितीच्या आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना त्यांनी दिले. यावेळी प्रकल्प संचालक  डॉ. केशव सांगळे यांच्यासह विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
           जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत घरकुलाची प्रकरण निकाली काढण्यासाठी प्रत्यक्ष गावात जाऊन लाभार्थी, ग्रामसेवक, अभियंते आणि बँक अधिकारी  यांच्या भेटी घेऊन  समन्वयाने घरकुल प्रकरणे मुदतीत निकाली काढावीत, असेही निर्देश या बैठकीत देण्यात आले.
          हरिदास यांनी यावेळी स्वर्णजयंती स्वरोजगार योजना, इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना (अपूर्ण व मंजूर घरकुल बांधकाम), नोव्हेंबर अखेर झालेला योजनानिहाय खर्च तसेच विभागीय आयुक्त स्तरावरील सुधारित घरकुल प्रतिक्षा यादीस मान्यता देण्यात येणाऱ्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला.             
 
Top