उस्मानाबाद जिल्ह्यात सन 2012 या सरत्या वर्षात अत्यंत वेगवान घडमोडी घडल्या, काही घटना नागरिकांच्या कायम स्मरणात राहण्यासारख्या असून आजही सर्वसामान्य नागरीक वर्षभरातील घटनांचा मागोवा घेत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे.
कुशल प्रशासक व सर्वसामान्य जनतेचे कैवारी म्हणून ओळखल्या जाणा-या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांची पुणे येथे भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या संचालक पदी बदली करण्यात आली. उस्मानाबाद जिल्हाधिकारी म्हणून ते कार्यरत असताना जिल्ह्यात त्यांनी अनेक आगळेवेगळे उपक्रम राबविले. या उपक्रमांची दखल ही शासन स्तरावर घेण्यात आली आहे. एक कुशल प्रशासक म्हणून त्यांनी लौकिक मिळविले आहे. त्याचबरोबर डॉ. गेडाम यांनी अनेकांच्या काळ्या धंद्याना चाप बसविल्याचे सर्वश्रूत आहे. विस्कटलेली प्रशासनाची घडी बसवून सर्वसामान्य जनतेसाठी ख-या अर्थाने प्रशासनाची सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिली व लोकप्रियता मिळविली. मात्र त्यांची अखेर बदली झाल्यामुळे सर्वसामान्यातून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यांच्या जागी नूतन जिल्हाधिकारी म्हणून डॉ. के.एम. नागरगोजे यांनी जुलैमध्ये सूत्रे स्विकारली.
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रसचे माजी आमदार शिवाजीराव पाटील बाभळगांवकर यांचे दीर्घ आजाराने दि. 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे तुळजापूर तालुक्यातील चार खांबापैकी एक खांब निखळला म्हणून विविध राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह अवघा जिल्हा शोकाकुल झाला. खासदार डॉ.पद्मसिंह पाटील, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आ. दिलीप सोपल, एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, आ.राणाजगजितसिंह पाटील, आ. राहुल मोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑगस्टमध्ये बार्शी येथे एका भव्य कार्यक्रमात कॉंग्रेसचे माजी आमदार तथा शिक्षण महर्षी सि.ना. आलुरे गुरूजी यांचे पुतणे माजी जि.प. सभापती दीपक आलुरे यानी कार्यकर्त्यासह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला उधाण आले. त्यामुळेच कॉंग्रेस पक्षाने दि. 16 सप्टेंबर रोजी बोरगांव (ता. तुळजापूर) येथे तालुक्यातील लिंगायत समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक जि.प. कृषी सभापती पंडीत जोकार, तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सिद्रामप्पा मुळे, शरणाप्पा कबाडे, कैलास चिनगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेवून लिंगायत समाज पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण, माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरूजी, माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार बसवराज पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कॉंग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे राहणार असल्याचे सांगितले. त्यामुळे काही काळ राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षातील कार्यकर्त्यात तर्क वितर्क लढवून जोरदार चर्चा रंगली होती.
दि. 19 ऑक्टोबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उस्मानाबाद जिल्हा दौ-यावर आले होते. यावेळी त्यांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्याचबरोबर तुळजापूर विकास प्राधीकरणातर्फे श्री तुळजाभवानी मंदिरात कार्यान्वित करण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उदघाटन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने दिला जाणा-या कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. तसेच तुळजापूर येथील 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे व कृषी उत्पन्न समितीतर्फे बांधण्यात आलेल्या गाळ्यांचे उदघाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. ग्रामीण भागातील तळागाळातील नागरिकांना आरोग्याच्या आधुनिक सुविधा मिळण्याकरीता राज्यातील 6 जिल्ह्यामध्ये राजीव गांधी जीवनदायी योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत असल्याचे सांगून या योजनेचे यश पाहता लवकरच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरु कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. त्याचबरोबर पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, कृषि व पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सार्वजनिक आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, खा.डॉ.पद्मसिंह पाटील, आ. बसवराज पाटील, आ. राणाजगजीतसिंह पाटील यांच्यासह अनेक मंत्री, विभागीय आय़ुक्त संजीव जयस्वाल व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात हजेरी लावली होती. तर दि. 23 नोव्हेंबर रोजी आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक महागुरू श्री श्री रविशंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उस्मानाबाद येथील पोलीस ग्राऊंड मैदानावर महासत्संग पार पडला. संत मारल्यानंतर जेवढे पाप लागते, त्याहीपेक्षा मोठे पाप कन्या भ्रुण हत्त्या केल्यानंतर लागते. मागचे सगळे विसरून यापुढे तरी कन्या भ्रुण हत्त्या करू नका, असे कळकळीचे आवाहन आर्ट आर्फ लिव्हींगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी केले. त्यानंतर महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात येऊन त्यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्यावतीने श्री श्री रविशंकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस भाजपचे खासदार वरूण गांधी यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यांच्या सोबत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, पुनम महाजन यांचीही उपस्थिती होती. दि. 3 मार्च रोजी पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण़ यांच्या हस्ते पत्रकार शिवाजी नाईक संपादित उस्मानाबाद जिल्हा विकास स्मरिणकेचे प्रकाशन करण्यात आले.
दि. 8 सप्टेंबर रोजी नळदुर्गमध्ये कॉंग्रेसचा भव्य युवक मेळावा पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, माजी राज्यमंत्री आ. बसवराज पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी कॉंग्रेस पक्षाने केलेल्या विकास कामाची माहिती देऊन तळागाळातील झोपडीत राहणा-या सर्वसामान्यांची समस्या, व्यथा सोडविण्याचे कार्यकर्त्यांना कानमंत्र देवून आगामी होणा-या निवडणुकीस सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. दि. 11 सप्टेंबर रोजी ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची पर्यावरण व सांस्कृतिक खात्याचे कॅबिनेट मंत्री ना. संजय देवतळे यांनी पाहणी केली. यावेळी पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण, खा.डॉ. पद्मसिंह पाटील, नगराध्यक्ष नितीन कासार, उपनगराध्यख शहबाज काझी, आदीजण उपस्थित होते. तसेच ना. संजय देवतळे दि. 11 सप्टेंबर रोजी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. दि. 7 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते कुक्कुट प्रकल्प नुतनीकरणाचे उदघाटन आणि अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. दि. 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र एसटी महामंडळाचे अध्यक्ष पदाची सूत्रे राष्ट्रवादीचे जीवनराव गोरे यांनी स्वीकारली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील 166 ग्रामपंचायतची सार्वत्रिक व 137 ग्रामपंचायतची पोटनिवडणुक दि. 21 ऑक्टोबर रोजी झाली. दि. 1 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र प्रदेश कॉंगेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या कॉंग्रेसच्या प्रचारार्थ जिल्ह्यात जाहीर सभा घेतली. दि. 17 फेब्रुवारी रोजी तुळजापूर पंचायत समितीवर पुनश्च कॉंग्रेसचे वर्चस्व, पालकमंत्री चव्हाण यांच्या कार्याची छाप कायम. जि.प.च्या निवडणुकीत तुळजापूर तालुक्यातील 9 गटापैकी 5 कॉंग्रेसकडे 3 राष्ट्रीकडे 1 शिवसेनेकडे.
दि. 13 मे रोजी पुणे येथील देवीचे भक्त विजय उंडाळे, नितीन उंडाळे यांनी तुळजाभवानी मंदिर संस्थानला 205 किलो वजनाची चांदीची देवीची मूर्ती व पावणे दोन किलो वजनाचे सोन्याचे दागिने अर्पण केले. दि. 6 ऑक्टोबर रोजी श्री तुळजाभवानी मातेचे भक्त मुंबईचे प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ. चंद्रशेखर वसंत चव्हाण व त्यांच्या सुविद्या पत्नी स्मिता चव्हाण यांनी देवीची पूजा-अर्चा करून हि-याचे नेत्र देवीस अर्पण केले. या हि-याची अंदाजे किंमत 3 लाख 60 हजार इतकी असून 22 कॅरेट सोन्यात तयार करण्यात आलेल्या दोन्ही डोळयात एकूण 36 हिरे बसविण्यात आले आहे. कळंब येथील प्रा. गोकुळ घोलप यांचे सुपुत्र सुजित घोलप याची मद्रास येथील आयआयटी महाविद्यालयात झालेल्या कॅम्पस इंटरव्यूव्हमधून अमेरिकेतील गुगल कंपनीमध्ये निवड झाली. दि. 26 ऑगस्ट रोजी तुळजापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने शिवसैनिक, पदाधिका-यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको केला.