मुंबई :- शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यविधीसाठी उभारण्यात आलेला चौथरा सोमवारच्या मध्यरात्रीनंतर शिवसेनेने हटवला. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि शिवसेना यांच्यात गेला महिनाभर उद्भवलेल्या वादाची अखेर झाली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे 17 नोव्हेंबर रोजी निधन झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी खुल्या पद्धतीने करण्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगी देण्यात आली होती. महापालिका अधिनियमन 1888 च्या 440 (2) अन्वये शिवसेनेला केवळ एक दिवसाची परवानगी देण्यात आली होती.
अंत्यविधी पार पडलेल्या चौथर्याच्या ठिकाणीच बाळासाहेब ठाकरे यांचे समाधीस्थळ उभारण्याबाबत सेनेने आग्रह धरला होता. त्यामुळे शिवसेना आणि पालिका प्रशासन यांच्यात वाद निर्माण झाला होता. चौथरा हटवण्यात होत असलेल्या विलंबाबत पालिका प्रशासनाने महापौर सुनील प्रभू आणि आणि सेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना नोटीस बजावली होती. आपण 17 डिसेंबर रोजी चौथरा हटवतो, अशी लेखी हमी सेनेच्यावतीने शुक्रवारी देण्यात आली होती.
सोमवारी मध्यरात्री बारा वाजता सेनेचे खासदार अनिल देसाई, माजी खासदार मोहन रावले आणि गटनेते सुभाष देसाई यांच्यासमक्ष चौथरा हटवण्याच्या कामास सुरुवात झाली. चौथरा हटवण्याचे छायाचित्रण करता येऊ नये, यासाठी चौथर्याच्या चारी बाजूंनी प्रथम उंच पडदे लावण्यात आले.
मंगळवारी पहाटे 2 वाजता गॅस कटरच्या सहाय्याने प्रथम अंत्यविधीसाठी बनवलेला लोखंडी सांगाडा कापण्यात आला. त्यानंतर एका जेसीबीच्या सहाय्याने अंत्यविधीसाठी बनवलेला चौथरा तोडण्यात आला. चौथर्याचा ढिगारा तीन डंपरमध्ये भरुन बाहेर काढण्यात आला. अर्ध्या तासाच्या आत चौथरा तोडून शिवाजी पार्कची जागा पूर्ववत करण्यात आली.
वर्सोवामध्ये विसर्जन
उद्ध्वस्त चौथर्याचा सर्व राडारोडा वर्सोवा येथे नेण्यात आला. तेथील समुद्रात त्याचे विसर्जन करण्यात आल्याची माहिती सदा सरवणकर यांनी दिली.
ना घोषणा, ना विधी
चौथरा काढण्यापूर्वी तेथे विधीवत पूजा केली जाईल असे सेनेच्यावतीने सांगण्यात येत होते. परंतु प्रत्यक्षात चौथरा जेसीबीने तोडताना तेथे ना पूजा झाली, ना बाळासाहेबांच्या घोषणा देण्यात आल्या.
* सौजन्य दिव्यमराठी