उस्मानाबाद -: जिल्हा प्रशिक्षण केंद्र खाजानगर, उस्मानाबाद येथे दि. 19 डिसेंबर रोजी पुरुष व महिला होमगार्डची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी भरतीसाठी येताना शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड, रहिवाशी प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट साईजचे फोटो व इतर तांत्रिक अर्हता असल्यास त्यांची व सर्व प्रमाणपत्रांची मुळ प्रत व  छायांकित प्रतिसह भरतीच्या ठिकाणी सकाळी 7 ते 9 यावेळेतत हजर राहावे, असे आवाहन होमगार्डचे जिल्हा समादेशक बाळकृष्ण भांगे यांनी केले आहे.                    
       शहरी व महिला प्रवर्गासाठी शहरापासून आठ किलोमिटरच्या आतील उमेदवारांची भरती शहरी प्रवर्गामध्ये केली जाईल व ग्रामिण पुरुष उमेदवारांची भरती शहरापासून आठ किलोमिटरच्या बाहेरील ग्रामिण प्रवर्गामध्ये केली जाईल.
     भरतीच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे असल्याचे कळविण्यात आले आहे. वय 18 ते 35 वर्ष, माजी सैनिकाच्या बाबतीत वयोमर्यादा 45 वर्ष. शैक्षणिक पात्रता:-एस. एस.सी. उत्तीर्ण, शारिरिक पात्रता:-पुरुष उमेदवारांच्या बाबतीत उंची 5 फुट 5 इंच. वजन-50 किलो, छाती न फुगवता 79 सेंटीमीटर व फुगवल्यानंतर 84 सेंटीमीटर. महिला उमेदवारांच्या बाबतीत उंची - 4 फुट 11  इंच, वजन- 42 किलो, शैक्षणिक पात्रता- एस. एस. सी. उत्तीर्ण.                 

निवृत्तीवेतनधारकांची गुरुवारी बैठक 
उस्मानाबाद -: जिल्हयातील सर्व राज्य निवृत्ती वेतनधारकांची डिसेंबर 2012 ची त्रैमासिक बैठक गुरुवार, दिनांक 20 रोजी दुपारी 3 वाजता जिल्हा कोषागार कार्यालय, उस्मानाबाद येथे आयोजित केली आहे.सर्व पदाधिकारी व इच्छुक निवृतीवेतन धारकांनी या बैठकीस उपस्थित राहावे असे कोषागार अधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
     डिसेंबर महिन्यात निवृत्तीवेतन धारकांच्या हयातीचे  दाखले घेऊन त्यांची नोंद करण्याचे काम चालु असल्याने माहे डिसेंबर महिन्याचे निवृती वेतन दोन दिवस विलंबाने मिळण्याची शक्यता आहे. वेळेवर निवृतीवेतन देण्याचा अटोकाट प्रयत्न करण्यात येत आहे. तथापि याबाबत दोन दिवस विलंब झाल्यास सर्व निवृतीवेतन धारकांची सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यांत आले आहे.  
 
Top