बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: वर्षभरापासून पोटदुखीच्‍या आजारावर नियमित उपचारासाठी आलेल्‍या महिलेचा विनयभंग केल्‍याची तक्रार त्‍या महिलेने बार्शी पोलिसात केल्‍याने शहरात खळबळ उडाली असून याप्रकरणी बोलताना डॉ. केसकर यांनी सदरचा प्रकार हा झाला नाही, त्‍या महिलेने तशा प्रकारची तक्रार का दिली याचा उलगडा थोडयाच दिवसात होईल असे सांगितले.
       न्‍यायव्‍यवस्‍थेवर आपला पूर्ण विश्‍वास असून सत्‍य काय आहे ते समोर येणारच आहे. न्‍यायदेवतेकडून मिळणारा न्‍याय हा योग्‍य असेल व त्‍याबाबत आपली मानसिकता झाल्‍याचेही त्‍यांनी यावेळी म्‍हटले. तक्रार दाखल केलेल्‍या दिवशीच आपण काही न बोलताच त्‍या महिलेची मानसिकता बार्शी पोलिसांना अवघ्‍या दोनच तासात कळाली असून आपण कोणत्‍याही अनिष्‍ट प्रकाराला भिक घालणार नसल्‍याचे डॉ. केसकर यांनी यावेळी नमूद केले.
मागील अनेक वर्षापासून कॅन्‍सरसारख्‍या रूग्‍णांवर चांगल्‍या प्रकारची ट्रिटमेंट करण्‍यासाठी सुप्रसिध्‍द असलेल्‍या डॉक्‍टरांच्‍या बाबत अशा प्रकारची तक्रार आर्थिक आशयापोटी अथवा मानसिक त्रासातून केली का याबाबतही उलटसूलट चर्चा सुरू आहे. सध्‍याच्‍या काळातील महिलांवरील अत्‍याचाराच्‍या घटना प्रकर्षाने दिसून येत असतानाच अशा प्रकारच्‍या तक्रारीने बार्शी शहरात चर्चेला उधाण आले आहे.
         सदरच्‍या तक्रारीची नोंद बार्शी पोलिसात शनिवार दि. 14 रोजी दाखल करण्‍यात आली असून सदरची महिला कुर्डूवाडीहून बार्शीत उपचारासाठी आली होती. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अरविंद घोडके हे करीत आहेत.

 
Top