नागपूर : भारतीय संगीत परंपरेची ओळख पाश्चात्य जगतास करून देणारा एक महान आंतरराष्ट्रीय कलाकार आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्येष्ठ सतार वादक भारतरत्न पंडित रविशंकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, “रविशंकर यांचे संगीत दुमुखी होते. सतार वादक आणि संगीतकार अशी ती दोन रूपे होती. सतार वादक म्हणून ते परंपरावादी, तर संगीतकार म्हणून सहजपणे वावरत असत. 1954 साली सोव्हिएत युनियनमधील मैफिल ही त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय मैफिल. त्यानंतर त्यांनी युरोप-अमेरिकेत अनेक कार्यक्रम केले. पंडितजींनी भारतातच नव्हे तर जगभरात संगीताचा श्रोता वर्ग निर्माण केला. रविशंकर यांना तीन वेळा ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यावरून त्यांच्या संगीत कौशल्याची दखल जगाने घेतली हे सिद्ध होते. भारतीय संगीताला जगामध्ये आदराचे स्थान मिळवून देणाऱ्या एका महान कलाकाराच्या निधनाने भारतीय संगीताची फार मोठी हानी झाली आहे.”