टोकिया -: जपानच्या पूर्वेकडे मोठा भूकंप आला असून सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. मियागीजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.4 एवढी मोजण्यात आली. केंद्रबिंदू जमिनीच्या 36 किलोमीटर आत होता.
गेल्या वर्षी जपानमध्ये मोठा भूकंप आला होता. त्यावेळी सुनामीमुळे जपानच्या पूर्वेकडे हाहाकार माजला होता. आताच्या भूकंपाचा केंद्रबिंदूही त्याच ठिकाणी होता. त्यामुळे सुनामीचा धोका आहे. टोकियोपासून 500 किलोमीटर अंतरावर हा केंद्रबिंदू आहे. परंतु, टोकियोमध्येही नागरिकांनी मोठे धक्के अनुभवले. टोकियोमध्ये राहणारे भारतीय सुरक्षित असून त्यांनीही धक्के जाणवल्याची माहिती महेश देशपांडे यांनी 'दिव्य मराठी'ला 'फेसबूक'च्या माध्यमातून दिली.
देशपांडे यांनी सांगितले की, सुमारे मिनिटभर भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सर्वप्रथम मोबाईलचा अलार्म वाजू लागला. त्यानंतर पत्नी आणि मुलांसह मी बेडरुममधून हॉलमध्ये आलो. तेथेही वस्तू हलत होत्या. काहीशी भीती वाटली. परंतु, नंतर धक्के थांबले.

* सौजन्य दिव्यमराठी