अणदूर -: ग्रामदैवत श्री खंडोबाची यात्रा उद्या शुक्रवारी भरत असून, यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट आणि श्री खंडोबा यात्रा कमिटी प्रयत्नशिल आहे.
     अणदूरच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० वाजता श्री खंडोबाची महापूजा होईल. रात्री दहा वाजता श्रीचा छबीना - मिरवणुक काढण्यात येईल. रात्री १२ वाजता नळदुर्गच्या मानकर्‍यांचे आगमन, त्यानंतर मानपानाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर अणदूर-मैलारपूर(नळदुर्ग) च्या मानकर्‍यांत खंडोबाची मूळ मूर्ती नेणे व आणण्याचा लेखी करार होईल. मध्यरात्री २.३० वाजता खंडोबाच्या मूर्तीच्या पालखीचे मैलारपूर (नळदुर्ग) कडे प्रस्थान होईल. पहाटे ५ वाजता मैलारपूर (नळदुर्ग) मंदिरात खंडोबाचे आगमन नंतर विधीवत प्रतिष्ठापना केली जाईल. यात्रेनिमित्त श्री खंडोबा मंदिर आणि परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे मंदिर उजाळून निघाले आहे.
विविध विकास कामांचा धडाका..
अणदूरच्या श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या सचिवपदाची सुत्रे तीन वर्षापुर्वी पत्रकार सुनील ढेपे यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी सर्व सदस्य आणि सभासंदाना आणि भक्तांना विश्वासात घेवून अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. यंदाच्या वर्षी अणदूर मंदिरातील लाईटची सर्व जुनी फिटींग बदलली आहे.नव्याने लाईट फिटींग करण्यात आली आहे.तसेच मंदिराचा सभामंडपाचा मुख्य दरवाजा आणि गृभगृहातील आतील दरवाजा मोडकळीस आल्याने तो बदलून नविन चंदन लाकडाचा बसविण्यात आला आहे. त्यावर आता लवकरच चांदीचा पत्रा बसविण्यात येणार आहे. त्याचबरोबर मंदिरात पाण्याची कायमस्वरूपी सोय होण्यासाठी मंदिराच्या बाहेर असलेल्या गुरव गल्लीतील आडातून विंद्युत मोटार बसविणे,नळ पाईपलाईन इत्यादी कामे करण्यात आली आहेत.

मैलारपूर मंदिरातही विकासकामे
पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे मंदिर परिसराच्या विकाससाठी एक कोटी रूपयाचा निधी मंजूर झाला आहे.त्याचा आराखडा मंजूर झाला असून, लवकरच कामे हाती घेण्यात येणार आहेत. मंदिर ट्रस्टच्या पैश्यातून गतवर्षी अंडरग्राऊंड लाईट फिटींग, अन्नदानासाठी नविन हॉल, पिण्याची पाण्याची व्यवस्था इत्यादी कामे करण्यात आली.यंदा उर्वरित कामे करण्यात येणार आहेत.
 
Top