जग उद्धारी
का म्‍हणतात लोक मुलगी असते परक्‍याचं धन?
जीव तिचा घेताना तुटत नाही का तिच्‍या आईचे मन ?
मुलाला करतात वंशाचा दिवा
मुलीला का करत नाही घरादाराची ज्‍योत
मुलाप्रमाणे मुलीलाही द्यावा तेवढाच आधार
जाणीव ठेवेल ती याची करील जगाचा ती उद्धार
संसारात राहुनही विसरणार नाही ती तुमचे उपकार
द्या मुलीलाही मुलाप्रमाणे तेवढाच आधार
मग पाहा कसा होतो या जगाचा उद्धार
नसते ती फक्‍त परक्‍याच धन
जिंकून घेते ती सर्वांचे मन
चुल आणि मूल याशिवाय
द्यावा तिलाही काही अधिकार
मग नक्‍कीच करेल पहा
ती या जगाचा उद्धार...

पोतदार वर्षा विजयकुमार
अंजनी प्रशाला, नळदुर्ग
ता. तुळजापूर, जि. उस्‍मानाबाद
इयत्‍ता :- नववी

 
Top