स्‍त्रीचा काय गुन्‍हा...?

काय आहे गुन्‍हा स्‍त्रीचा
का स्‍त्री जातीत जन्‍माला आली हाच ?
का स्‍त्रीने न जातीला जन्‍म दिला हा ?

आई होऊन जन्‍म दिला पुरूषाला तीच स्‍त्री
बहिनरुपी रक्षा करते भावा तीच स्‍त्री
पत्‍नी रुपी साथ निभावते आयुष्‍यभर तीच स्‍त्री

तीच स्‍त्री सोसते नराधमाचे अत्‍याचार
तीच स्‍त्री ऐकते जगाचा दुराचार
तीच स्‍त्री झेलते अग्‍नीचे घाव

का तिने सोसावे हे दुराचार
का तिच्‍याच पदरी हे अत्‍याचार
म्‍हणून आज सांगते हे नारी पेटून उठ

बस, आता या पुरुषनराधमाची दया
ज्‍याने स्‍त्रीवरच घातली आपली काळी छाया
होऊन चंडीका कर त्‍या रावणरुपी राक्षसाचा विनाश
ज्‍याने केला स्‍त्रीच्‍या पावित्र्याचा नाश
सौ. कल्‍पना गायकवाड
नळदुर्ग

 
Top