नागपूर : मराठवाड्यातील उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत सर्वपक्षीय आमदारांनी 12 डिसेंबर रोजी राजभवन येथे राज्यपाल के. शंकरनारायण यांची भेट घेऊन चर्चा केली.
सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये खा. डॉ. पद्मसिंह पाटील, राज्य मार्ग परिवहन मंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, आमदार दिलीप देशमुख, जयप्रकाश दांडेगावकर, राणा जगजितसिंह पाटील, राहूल मोटे, बाबासाहेब पाटील, बाबा जानी दुराणी, विक्रम काळे, सतीश चव्हाण, चंद्रकांत दानवे, शंकर धोंडगे, पृथ्वीराज साठे यांचा समावेश होता.
उस्मानाबाद आणि बीड हे मराठवाड्यातील दोन जिल्हे मागास असून या जिल्ह्यांचे दरडोई उत्पन्न कमी असल्याची बाब राणा जगजितसिंह पाटील यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिली. मराठवाड्याचे सरासरी पर्जन्यमान कमी असून मागील काही वर्षापासून पाऊस कमी पडत असल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी ही तीन मीटरपेक्षाही खोल गेल्यामुळे शेतक-यांना सिंचनासाठी अडचण निर्माण होत असल्याचे जगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत कामे पूर्ण करण्यासाठी 3275 कोटी 56 लक्ष रुपयांची आवश्यकता असून त्यापैकी 595 कोटी 43 लक्ष रुपये निधी जलसंपदा विभागाने वितरित केला आहे. उर्वरित निधी तातडीने मिळाल्यास अपूर्ण सिंचन प्रकल्प वेळीच पूर्ण करता येणार असल्याचे शिष्टमंडळाने राज्यपालांना सांगितले.
दरवर्षी मराठवाड्यात कमी पडणा-या पावसामुळे उस्मानाबाद व बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी राज्यपालांकडे केली. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे राज्यपालांनी शिष्टमंडळाला सांगितले. शिष्टमंडळाच्या वतीने राणा जगजितसिंह पाटील यांनी उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील प्रश्नांचे सादरीकरण केले.