सोलापूर : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे हे सोलापूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
        शुक्रवार दि. 7 डिसेंबर रोजी पहाटे 12.45 वाजता सांगोला शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 7 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी    (स्थळ- शासकीय विश्रामगृह सांगोला). सकाळी 8.15 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अजित पवार माजी उपमुख्यमंत्री यांच्या समवेत सांगोला तालुक्यातील विविध कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3 वाजता आ. अजित पवार यांच्या समवेत हेलिकॉप्टरने पुण्याकडे प्रयाण.
    शनिवार दि. 8 डिसेंबर 2012 रोजी सकाळी 7 वाजता पुणे येथून सिध्देश्वर एक्स्प्रेसने सोलापूर येथे आगमन. सकाळी 7.20 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 9 वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर) सकाळी 11 वाजता सोलापूर जिल्हयाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची समन्वय बैठक (स्थळ- शासकीय विश्रामगृह सोलापूर).
 
Top