उस्मानाबाद -: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वारण दिनानिमित्त आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करुन आदरांजली वाहण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
     अप्पर जिल्हाधिकारी ज्ञानोबा फुलारी,निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी सर्वश्री बी.एम. चाकूरकर, शिल्पा करमरकर, राम मिराशे, श्री.तडवी, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
      उस्मानाबाद शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास विविध सामाजिक संस्था,संघटना यांच्यावतीनेही अभिवादन करण्यात आले.
 
आयुर्वेद महाविद्यालयात भारतरत्न डॉ. आंबेडकर यांना आदरांजली
       
उस्मानाबाद -: शासकीय आयुर्वेद महाविद्यालय,उस्मानाबाद येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. अधिष्ठाता पी. एच. खापर्डे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील व रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.                                                        

 
Top