उस्मानाबाद -: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे व त्यांच्या अंतर्गत असणा-या पुणे, औरंगाबाद, नागपुर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण (रत्नागिरी) या नऊ विभागीय मंडळात कनिष्ठ  लिपिकाची रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. मंडळ स्तरावर छाननी अंती लेखी परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार दिनांक 16 डिसेंबर, 2012 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत मंडळाने निश्चित केलेल्या परीक्षा  केंद्रावर घेण्यात येणार  आहे. पात्र उमेदवारांना परीक्षेसाठी  आवश्यक असणारे प्रवेशपत्र व सूचना मंडळाच्या www.msbshsc.sc.ln या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे लातूर विभागीय मंडळाच्या  सचिवांनी  कळविले आहे.         

*  खाजगी विद्यार्थ्यांना सूचना  
उस्मानाबाद -: ज्या विद्यार्थ्यांनी माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च, 2013 च्या परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी ( फॉर्म नं. 17 ) म्हणून नाव नोंदणी केली आहे, त्या पात्र विद्यार्थ्यांना सुचना पत्रे पाठविण्यात आलेली आहेत. या विद्यार्थ्यांनी त्यांना  दिलेल्या संपर्क केंद्रावर प्रत्यक्ष संपर्क साधून आवेदनपत्र भरण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केली आहे                         
 
Top